अंकलेश्वर – बऱ्हाणपूर चोपडा यावल रस्त्याची दुरुस्तीसाठीची आमदार लताताई सोनवणे यांच्या मागणीला यश

तात्काळ दुरुस्ती न केल्यास १५ ऑगस्ट २०२४ रोजी उपोषणास बसण्याचा दिला होता ईशारा

बातमी शेअर करा...

अंकलेश्वर – बऱ्हाणपूर चोपडा यावल रस्त्याची दुरुस्तीसाठीची आमदार लताताई सोनवणे यांच्या मागणीला यश

तात्काळ दुरुस्ती न केल्यास १५ ऑगस्ट २०२४ रोजी उपोषणास बसण्याचा दिला होता ईशारा

चोपडा l प्रतिनिधी

अंकलेश्वर – बऱ्हाणपुर चोपडा यावल रस्त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच झाले असून या रस्त्यावरील चोपडा ते गलंगी दरम्यान काही पुलावरील पुष्ठभाग खराब झालेला आहे.

तसेच पुर्ण रस्त्याचा पृष्ठभाग हे अत्यंत खराब झालेला असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच या पुर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडलेले असून अडावद गावात रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असुन तरी या बाबीचा विचार करावा.

चोपडा ते यावल रस्त्यावरील या पुर्वी दुरुस्त केलेल्या रस्त्याची तसेच अडावद गाव अंतर्गत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास मी १५ ऑगस्ट २०२४ रोजी उपोषणास बसेल. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली होती.

रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याबाबतचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार) परियोजना कार्यान्वय इकाई, जळगांव यांच्याकडून दखल

चोपडा तालुक्याच्या लाडक्या आमदार लताताई सोनवणे यांच्या पत्रकाची भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (सड़क परिवहन और राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार) परियोजना कार्यान्वय इकाई, जळगांव यांच्याकडून दखल घेण्यात आली असून दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,

तळोदा ते महाराष्ट्र/मध्यप्रदेश हद्‌दी पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून साधारणतः ५०% काम पूर्ण झालेले आहे सध्या पावसामुळे डांबरीकरणाचे काम करता येणे शक्य नाही.

परंतु आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार चोपडा ते धानोरा येथे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. (सोबत फोटो जोडत आहोत). दि. १६ ऑगस्ट २०२४ पासून अडावद येथे दुरुस्ती काम करण्याचे नियोजन आहे.

अडावद धानोरा-किनगाव या ठिकाणच्या दुरुस्तीचे काम दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ पर्यत पूर्ण करण्यात येईल. वरील बाबी विचारात घेता व आपल्या मागण्याबाबत सकारात्मक कार्यवाही प्रगती पथावर असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम