
अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार
अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार
अडावद ता.चोपडा अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावर वर्डी फाटा ते वडती फाटा दरम्यान चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील स्वार मगन जगन बारेला (२५) व रगन जगन बारेला (१८) हे दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झाले.
८ रोजी संध्याकाळी ५ वाजेचा सुमारास अडावद चोपडा दरम्यान वडती फाट्याजवळ अडावदकडून चोपडाकडे जाणारी एम.एच.०४ एच. एफ. ८२९६ चार चाकीस समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या झालेल्या भिषण अपघातात दुचाकीवरील स्वार मगन जगन बारेला (२५) व रगन जगन बारेला (१८) रा. वर्डी ता. चोपडा हे दोन्ही सख्खे भाऊ जागीच ठार झाले. अपघात झाल्यानंतर तात्काळ अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळ गाठले. वाहतूक सुरळीत केली. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील प्रशांत पाटील (मामू) यांनी दोघांना रुग्णवाहिकेत टाकले. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. पवन पाटील यांनी दोघांना मृत घोषीत केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पवन पाटील यांनी शविच्छेदन केले.
याबाबत चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर गुन्हा तेथून शून्य क्रमांकाने अडावद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम