हृदयात भगवंत यावा यासाठी अंतकरण शुद्ध करणे महत्त्वाचे – मोरदे महाराज

बातमी शेअर करा...

बातमीदार |गुरुवार दि 1 फेब्रुवारी २०२४

हृदयात भगवंत यावा यासाठी अंतकरण शुद्ध करणे महत्त्वाचे – मोरदे महाराज

गणेशाचे जन्मोत्सव साजरा; शोभायात्रेने कथेची सांगता

जळगाव – पिंप्राळा येथील सोनी नगर परिसरात श्री शिव महापुराण कथेत देवदत्त महाराज यांनी एकादश रुद्र तसेच शतरुद्र संहितेचे वर्णन केलं, कार्तिक स्वामींचा जन्माची कथा तसेच भगवान गणपती बाप्पांचे प्रागट्य कथेतून सांगण्यात आले.

बुधवारी गणपती जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गणपती,शिवकन्या अशोक सुंदरीचा सजीव देखावा करण्यात आला होता.
मोरदे महाराजांनी कथेत निरूपण करतांना सांगितले की,

अंतकरण

शिव हे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ जाणणारे आहेत म्हणून त्यांना त्रिकालदर्शी असं म्हणतात. स्वतः विष प्राशन करून देवांना अमृत देऊन भगवान शिवानी या संपूर्ण ब्रम्हांडाचे रक्षण केले आहे.

आयुष्यामध्ये जगाला चांगले द्यावं आणि भगवंताचे चिंतन करावं. घरी पाहुणे येणार म्हटल्यावर जसं आपण घर सुंदर बनवतो स्वच्छ करतो त्याप्रमाणे हृदयात भगवंत यावा यासाठी अंतकरण शुद्ध करणे खूप महत्त्वाचे आहे, असं कथेतून देवदत्त महाराज यांनी सांगितले.

https://fb.watch/pX1pMBALeC/?mibextid=Nif5oz

बुधवारी कथेची सांगता झाली असून श्री शिव महापुराण कथेचे शोभायात्रा दुपारी चार वाजता संपन्न झाली. उद्या दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा गोपाळ काल्याचे किर्तन संपन्न होऊन शिव महापुराण कथेचा समारोप होईल.

कथेत महाआरती माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, मनसे उप महानगराध्यक्ष आशिष सपकाळे, श्रीकृष्ण मेंगडे, राजेद्र निकम, विशाल त्रिपाठी ,मांगिलाल गिल यांच्या हस्ते करण्यात आली.

Also Read:

अन्नत्याग उपोषण : बालकल्याण समिती बरखास्त करा, विदयार्थी संघटना ठाम 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम