अंबरनाथ येथील वाहतुकीस अडथळा ठरणारे खांब हटविणार

बातमी शेअर करा...

अंबरनाथ (प्रतिनिधी ) ;- हुतात्मा चौक ते स्वामी समर्थ चौक या मार्गावरील विद्युत खांबांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याने, अंबरनाथ नगरपरिषदेच्या विद्युत विभागाकडून हे खांब शुक्रवार,१० जानेवारी रोजी रोजी स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील पाटील यांनी म्हटले आहे.

यात म्हटले आहे कि, या ठिकाणी असणारे HT/LT विद्युत प्रवाह महावितरणद्वारे काही कालावधीसाठी खंडित केला जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने खांबांवरती येणाऱ्या झाडांच्या फांद्या नगरपरिषदद्वारे तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे अंबरनाथ शहरातील नागरीकांनी दि.१० जानेवारी रोजी सकाळी८ ते दुपारी ३ पर्यंत पर्यायी मार्गांचा अवलंब करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम