अंबरनाथ: घरपट्टी खात्यातील समस्यांमुळे नागरिक त्रस्त, माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांची तक्रार

गेल्या दोन-तीन वर्षांपासून घरपट्टी विभागात सुरू आहे गोंधळ

बातमी शेअर करा...

अंबरनाथ: घरपट्टी खात्यातील समस्यांमुळे नागरिक त्रस्त, माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांची तक्रार

गेल्या दोन-तीन वर्षांपासून घरपट्टी विभागात सुरू आहे गोंधळ

अंबरनाथ । प्रतिनिधी

अंबरनाथ नगरपरिषदेच्या घरपट्टी खात्यातील अनियमितता आणि गोंधळामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे.

माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांनी या समस्यांकडे लक्ष वेधत प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ आणि मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांना निवेदन सादर केले आहे.

घरपट्टी उत्पन्न हा अंबरनाथ नगरपरिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. शहरातील ९० टक्के नागरिक दरवर्षी प्रामाणिकपणे कर भरत असतानाही,

अंबरनाथ

घरपट्टी पावती वेळेवर मिळत नसणे, कर आकारणीतील गोंधळ, हस्तांतरित मालमत्तांच्या नावांमध्ये बदल न होणे, तसेच ऑनलाईन आणि

ऑफलाईन पद्धतीने घरपट्टी भरण्यासाठी साईट सतत बंद राहणे अशा समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्यांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. तक्रारी वाढू लागल्याने माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांनी

याबाबत लोकप्रतिनिधी म्हणून हस्तक्षेप करत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“नागरिकांच्या घरपट्टी खात्यातील अडचणी गंभीर असून यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. संबधित खात्याची बैठक बोलवून

या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत,” अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांनी केली आहे.

सध्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रशासनावर नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा दबाव वाढला आहे.

या निवेदनामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, प्रशासनाने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.

हे ही वाचा👇

कृतज्ञता सोहळ्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भव्य सत्कार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम