अखेर कजगाव स्टेशनला हुतात्मा एक्सप्रेस चा थांबा

कजगाव ता.भडगाव अखेर कजगाव स्टेशनला हुतात्मा एक्सप्रेस चा थांबा सुरू केल्याने परिसरातील पन्नास खेड्यातील नागरिकांनी खासदार उन्मेष पाटील सह रेल्वे प्रशासनाचे आभार मानले खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच रेल्वे बोर्ड दिल्ली यांचेकडे ठोस पाठपुरावा करत बंद केलेला थांबा सुरू केला गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली हुतात्मा एक्सप्रेस दि.१० पासुन सुरू झाली या एक्स्प्रेस ला पुणे कडे जाण्यासाठी चा कजगाव स्टेशनचा थांबा बंद करण्यात आला होता सदर चा थांबा सुरूच ठेवावा या साठी कजगाव सह परिसरातील पन्नास खेड्यातील नागरिकांनी खासदार उन्मेश पाटील यांचेकडे मागणी केली होती तसेच परिसरातील बावीस खेड्याच्या ग्रामपंचायत ने रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड दिल्ली,जनरल मॅनेजर मुंबई, डीआरएम भुसावळ यांना निवेदन पाठविले होते हुतात्मा एक्स्प्रेस च्या थांब्या साठी कजगाव सह पन्नास खेड्यातील असंख्य नागरिकांनी ठोस पाठपुरावा केल्याने या मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री,रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड दिल्ली यांचेकडे ठोस पाठपुरावा केल्याने कजगाव स्टेशनला थांबा देण्यात आला बाबत वृत्त की कजगाव चे रेल्वे स्टेशन परीसरातील पन्नास ते साठ खेड्याचे केंद्रबिंदु असल्याने भडगाव, चाळीसगाव, पाचोरा,पारोळा,कन्नड, सोयगाव या तालुक्यातील कजगाव च्या जवळपास असलेल्या पन्नास ते साठ गावातील प्रवाशांची चढउतार कजगाव च्या स्टेशन वरून असते या स्टेशनवर अगोदर भुसावळ-मुंबई, भुसावळ-देवळाली व हुतात्मा एक्स्प्रेस या तीन गाड्याना थांबा होता दरम्यान अडीच वर्षा पुर्वी कोरोना मुळे या गाड्या बंद करण्यात आल्या दरम्यान एक भुसावळ-इगतपुरी मेमुट्रेन सुरू करण्यात आली मात्र ती सुरू केल्याने एकाच बाजुची म्हणजेच नाशिक जाण्याची सोय ग्रामीण भागातील प्रवाशांची झाली मात्र सकाळी जळगाव जाण्यासाठी कोणतीही रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम