अखेर त्या २२ दुकानदारांनी प्रशासनाला दिली बेमुदत उपोषणाची नोटीस

२५ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा

बातमी शेअर करा...

अखेर त्या २२ दुकानदारांनी प्रशासनाला दिली बेमुदत उपोषणाची नोटीस

२५ जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा

जळगाव I प्रतिनिधी
पाळधी तालुका धरणगाव येथील मुस्लिम समाजातील २२ दुकाने ३१ डिसेंबर २४ च्या मध्यरात्री लुटून जाळून नष्ट करण्यात आली त्याबाबत जळगाव जिल्हा एकता संघटने तर्फे १,३,५,८,९,११ व १३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, अप्पर सचिव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई व जळगाव, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जळगाव तसेच धरणगाव तहसीलदार व पोलीस निरीक्षक धरणगाव व जिल्हा पेठ पोलीस स्टेशन यांच्याकडे वारंवार तक्रार निवेदन दिले मात्र शासनाने जळालेल्या दुकानदारांबद्दल कोणतीही सहानुभूती न दाखवल्याने एवढेच नव्हे तर त्यातील गुन्हेगारांना अद्याप पावेतो अटक न केल्याने शेवटी पाळधी येथील ते २२ दुकानदार आपल्या कुटुंबासहित प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २५ जानेवारी संध्याकाळी ४ वाजेपासून बेमुदत उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे बसणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पोलीस अधीक्षक, निवासी उप जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग, तसेच पोलीस निरीक्षक धरणगाव पोलीस स्टेशन व जिल्हा पेठ पोलीस स्टेशन यांना देण्यात आलेली आहे.

“त्या”* *दुकानदारांना एकता संघटने चे पूर्ण सहकार्य
२२ दुकानदार कुटुंबासहित उपोषणाला बसणार असले तरी जळगाव जिल्हा एकता संघटना सुद्धा त्यांच्यासह उपोषणाला बसून त्यांना सहकार्य करणार असल्याचे एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

एकता संघटनेतर्फे आरोपींच्या जामीनाला विरोध
पोलिसांनी २० दिवसात फक्त ८ आरोपींना अटक केली असून त्यापैकी ६ आरोपी जामीन वर सुटले असून २ आरोपींच्या जामीनाला एकता संघटनेतर्फे एडवोकेट शरीफ पटेल यांच्या मार्फत विरोध करण्यात आला असून न्यायालयाने फिर्यादी पक्षांचे म्हणणे ऐकून त्या दोघांच्या जमिनीला लांबणीवर टाकलेले आहे.

पोलिसांच्या तपासावर व कारवाई बाबत प्रश्नचिन्ह* १ ते २० जानेवारी पर्यंत फक्त ८ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली केलेली नाही, एवढेच नव्हे तर कोणत्या आरोपीने कोणती भूमिका निभवली ते सुद्धा रिमांड यादीमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले नाही, आरोपीकडून काय हस्तगत करायचे आहे हे सुद्धा नमूद नसल्याने ८ पैकी ६ आरोपींना न्यायालयाने जामीन दिलेला आहे.
पोलिसांच्या या सॉफ्ट (मवाळ) भूमिकेबाबत एकता संघटनेने पोलीस अधीक्षक यांच्या कडे प्रश्न उपस्थित केलेला आहे.

जळगावकरांनी अन्यायाला वाचा फोडावी – एकता संघटन

जळगाव जिल्ह्यातील सर्व धर्मीय, सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संघटना यांनी एकत्रितरित्या पाळधी येथील नुकसानग्रस्त दुकानदारां सोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते करीत असलेल्या उपोषणात सहभाग घ्यावा व त्यांना सहकार्य करावे असे आवाहन एकता संघटनेतर्फे मुफ्ती हारून नदवी, मुफ्ती खालीद ,मौलाना रहीम पटेल, फारुक शेख, नदीम मलिक, अनिस शहा, मजहर खान, अमजद पठाण, मतीन पटेल, युसूफ खान व अन्वर खान आदींनी केलेले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम