
अचुक बिलींग आणि वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली गरजेची
कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांच्याकडून आढावा
अचुक बिलींग आणि वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली गरजेची
कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांच्याकडून आढावा
धुळे/ जळगाव I प्रतिनिधी ग्राहकांकडून वापरण्यात आलेल्या प्रत्येक युनिटचे अचुक बिलींग आणि त्याची वेळेत व सातत्यपूर्वक वसुली यावर महावितरणने लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यासाठी वसुली मोहीम राबविण्यात येत असून वीजग्राहकांनीही महावितरणच्या मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी केले.
महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे पालकत्व कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांच्याकडे आहे. त्यासाठी श्री औंढेकर यांनी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणच्या वीजबिल वसुलीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (17 जानेवारी) धुळे येथील महावितरणच्या सभागृहात सर्व कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, शाखा अभियंते, वीज तंत्रज्ञ व जनमित्रांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी नादुरुस्त वीज मिटर बदलणे, नवीन वीज जोडण्या देणे, अचुक बिलींग आणि सातत्यपूर्वक वसुली यासह मुख्यमंत्री सौर वाहिनी, प्रधानमंत्री सौरघर योजना, सौरग्राम आदी योजनांवरही मार्गदर्शन केले. बैठकीस मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी, अधीक्षक अभियंता निरज वैरागडे यांच्यासह सर्व अधिकारी, अभियंते व कार्मचारी उपस्थित होते.
धुळे येथे झालेल्या बैठकीस धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 700 ये 800 कर्मचारी उपस्थित होते. त्यापूर्वी श्री औंढेकर यांनी जळगाव मंडल कार्यालयात सर्व विभाग, उपविभाग आणि शाखा अभियंत्यासह वीज कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना वीजसेवेबद्दल सजग केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम