
अज्ञात वाहनाच्या धडकेत काका पुतणे ठार
पाचोरा येथील घटना
पाचोरा I प्रतिनिधी
अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये जळगावकडून चाळीसगावकडे जाणाऱ्या दुचाकीने जाणारे काका पुतण्या जागीच ठार झाल्याची घटना पाचोरा शहरात सोमवारी घडली असून याबाबत पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर मंगतू राठोड (वय ३६ )आणि संकेत भरत राठोड (वय १८ दोन्ही रा. चंडिकावाडी ता.चाळीसगाव )असे मयत काका पुतण्याचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्याती रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर राठोड हे आपल्या पुतण्या संकेत भरत राठोड याच्या सोबत जळगावहून चाळीसगाव येथे जाण्यासाठी सोमवारी २० जानेवारी रोजी पहाटे ४.३० वाजता दुचाकीने निघाले होते. पाचोरा शहरातील निर्मल सीडस् कंपनीच्या समोरील रस्त्यावरून जात असतांना भडगावकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघात ज्ञानेश्वर राठोड आणि पुतण्या संकेत राठोड यांचा मृत्यू झाला.
याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे पुढील तपास करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम