अटक – वर्डी फाट्यावर गावठी कट्ट्यासह तिन आरोपींना अटक

एक गावठी कट्टा, २ जिवंत काडतूस व मोटर सायकल सह ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा...

वर्डी फाट्यावर गावठी कट्ट्यासह तिन आरोपींना अटक

एक गावठी कट्टा, २ जिवंत काडतूस व मोटर सायकल सह ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त

चोपडा – अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील वर्डी फाट्यावर दि. २० रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तीन आरोपी संशयित रित्या उभे असताना अडावद पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी असता त्यांचा ताब्यात एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुस व एक मोटार सायकल सह तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तीन आरोपींना अटक

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या समारास वर्डी फाट्यावर तीन संशयित तरुण उभे असल्याचे गुप्त बातमी अडावद पोलिसांना मिळाली.

त्या अनुषंगाने पोलीसांनी तीनही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांचा ताब्यात २५ हजार रुपये किमती चा एक गावठी कट्टा, २ हजार रुपये किमतीचे २ जिवंत काडतुस तसेच २५ हजार रुपये किमती ची मोटार सायकल असा एकुण ५२ हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हा व्हिडिओ पाहा👇

आरोपी गजानन नामदेव पाटील वय २६ रा. वर्डी ता. चोपडा, अमोल हुकूमचद धनगर वय २५ रा. वर्डी ता. चोपडा, कुणाल समाधान कोळी वय २७ रा शिंदेवाडा चोपडा या तिनही आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपींविरुद्ध अडावद पोलिस स्टेशन ला ४/२०२४ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ प्रमाणे पोहेकॉ नशीर तडवी यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच आरोपींना आज चोपडा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पुढील तपास पोहेकॉ समाधान धनगर हे करीत आहेत.

हे ही वाचा👇

मोर्चा – शेतमजूर युनियनचे २४ – २५ जानेवारीला मोर्चा

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम