अण्णाभाऊ साठे यांची जयंती वक्षरोपणाने साजरी..

बातमी शेअर करा...
अण्णाभाऊ साठे यांची जयंती वक्षरोपणाने साजरी..
कालखेड ग्रामपंचायतची अनोखी मानवंदना
शेगाव (प्रतीनीधी)
गट ग्राम पंचायत कालखेड- गोळेगाव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज १ आगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. ही जयंती केवळ त्यांच्या फोटोला हार व पुष्प वाहून साजरी न करता या निमीत्त वृक्षरोपणा सारगा अनोख्या उपक्रमाने जयंती साजरी करण्यात आली.
      लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती दिनाचे औचीत्य साधत कालखेड येथे विवीध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले. आज दि. १आगस्ट रोजी कालखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात  सरपंच पवन बरींगे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात येऊन माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर कालखेड येथील प्राथमीक शाळेच्या प्रागणात पिंपळ व वडाची झाडं लावण्यात आली. तसेच अंगणवाडी एक व दोन परीसरात व स्मशानभूमी लगत सुद्धा वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्षरोपणात पिंपळ,वड,फणस व अंजीर कडूनिंब आदी. अकरा झाडांचा समावेश आहे.जयंती अभिवादन कार्यकर्माला व वृक्षरोपणाला उपसरपंच पंडीत परघरमोर ,सचिव सुषमा सावरकर,मुख्याध्यापिका माया मसने,शिक्षक आशिष नाचने अंगणवाडी सेविका भारती हेलोडे,शुद्धमती गणेश,जोती शेगोकार,सत्यभामा चोखंडे, आदींसह शालेय विद्यार्थ्यांची उपस्थीती होती.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम