
अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, डेराबडी (ता. चाळीसगाव) ; इयत्ता १० वी चा निकाल १००%
अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, डेराबडी (ता. चाळीसगाव) ; इयत्ता १० वी चा निकाल १००%
जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, डेराबडी (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला आहे. शाळेतील एकूण २० विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ होऊन सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.
या वर्षी शाळेच्या निकालात तीन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यामध्ये जाधव पियूष अनिल याने ७९.२०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जाधव सुमित अरुण (७७.२०%) आणि जाधव निशांत भैय्यासाहेब (७६.६०%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे.
निकालाचे एकूण विश्लेषण खालीलप्रमाणे :
विशेष प्राविण्य श्रेणी – ३ विद्यार्थी
प्रथम श्रेणी – ६ विद्यार्थी
द्वितीय श्रेणी – ११ विद्यार्थी
प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी निकालामागे शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत ठरली असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
—

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम