
अनोळखी वृद्ध महिलेचा मृत्यू
अनोळखी वृद्ध महिलेचा मृत्यू
नशिराबाद येथील हॉटेल सावन समोरील घटना
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील हॉटेल सावन समोरील रस्त्यावर पडलेल्या ८० वर्षीय वृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. त्या महिलेला योगेश चव्हाण यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, त्या महिलेला मयत घोषीत केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी सीएमओ डॉ. स्नेहल दुग्गड यांनी दिलेल्या खबरीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वृद्ध महिले४ने२ अंगात निळ्या रंगाची मळकटलेली साडी परिधान केली असून तरी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोहेकों अजित पाटील यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम