
अमळनेरात धूमस्टाईलने महिलेची चैन लांबविली
दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा
अमळनेर;– पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी धुमस्टाइ्रल लांबविल्याची घटना शहरातील प्रताप मील परिसरात बुधवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलकाबाई सुभाष लोहार वय ५९ रा. प्रताप मिल, अमळनेर या महिला बुधवारी २९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घराच्या परिसरात पायी जात असतांना त्यांच्या समोरून दुचाकीवर अनोळखी दोघांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जोरात बळजबरीने तोडून चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम