अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा...

बातमीदार l गुरुवार दि. २९ फेब्रुवारी २०२४
जळगाव ;– शाळेच्या गेट जवळून १५ वर्षीय मुलीला दुचाकीवर बसवून तिला मित्राच्या रूमवर नेत अत्याचार करून पुन्हा शाळेच्या आवारात सोडून दिल्याचा धक्कदायक प्रकार खेडी ता. भुसावळ परिसरात १ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा ते ५ वाजेच्या दरम्यान घडला असून याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिपेठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, . जळगावात एका परिसरात राहणाऱ्या १४ वर्ष १० महिन्याची मुलगी हि एका शाळेत शिकत असून आरोपी हर्षल दीपक सोनवणे वय २१ रा. भुसावळ याने १ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पीडित मुलीला शाळेच्या गेटजवळून मोटार सायकलवर बसवून तिला खेडी ता. भुसावळ परिसरात राहणाऱ्या आपल्या एका मित्राच्या रूममध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध न करून तिला पुन्हा सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शाळेच्या गेटजवळ सोडून दिले.

यांबाबत पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला २८ फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा तीन वाजता भादंवि कलम ३६३,३७६ (३) , लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम