अल्पवयीन मुलाने घेतला गळफास

यावल तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा...

 अल्पवयीन मुलाने घेतला गळफास
यावल तालुक्यातील घटना
यावल प्रतिनिधी

एका १५ १५ वर्षीय मुलाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील शिरसाद येथे उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल घुसला पावरा (वय १५) असे मयत मुलाचे नाव आहे.

शिरसाड गावालगत सोहम अरुण महाजन यांचे शेत असून या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने अनिल घुसला पावरा (वय १५) या अल्पवयीन मुलाने गळफास घेतला . मुलाचा मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आमशा पावरा यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तपास पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम