अल्पसंख्याक शाळांनी ३१ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...

औरंगाबाद, दिनांक 22 ऑगस्ट | : अल्प संख्यां क बहुल शासनमान्यु खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठच महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थाय, नगर पालिका, नगर परिषद शाळा व अपंग शाळांनी अनुदान योजनेअंतर्गत अनुदान प्रस्ताुव पात्र शाळांनी औरंगाबाद जिल्हािधिकारी कार्यालयात 31 ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे यांनी केले आहे. मुदतीनंतरचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असेही त्यांनी कळवले आहे.
प्रस्ताव सादर करण्यालकरिता https://mdd.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील शासन निर्णय, कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. शाळांमध्ये धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी किमान 70% आणि अपंग शाळांमध्ये 50% असणे आवश्यक आहे. यापूर्वी या योजनेंतर्गत पाच वेळा अनुदान प्राप्त शाळा, संस्था, महानगर पालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखालील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळा, स्वंय-अर्थसहाय्यित शाळा या योजनेंतर्गत अनुदानासाठी पात्र असणार नाहीत, असेही त्यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम