
अहिराणी आदिवासी साहित्यिक सुनील पोलाद गायकवाड यांचा हिमाचल प्रदेश सरकाकडून सन्मान करण्यात आला
कजगावचे सुनील गायकवाड यांचा हिमाचल सरकारकडून सन्मान कजगाव ता भडगाव येथील शिक्षक व अहिराणी आदिवासी साहित्यिक सुनील पोलाद गायकवाड यांचा हिमाचल प्रदेश सरकाकडून सन्मान करण्यात आला भारत सरकार आणि साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हिमाचाल प्रदेश सरकारने शिमला येथे आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने कला साहित्य राजकीय माध्यम सामाजिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जगभरातील विविध ३४ देशातील मान्यवर व भारतातील अनेक मान्यवरांचा यावेळी हिमाचल प्रदेश सरकारने गौरव केला सुनील गायकवाड यांनी भिली आदिवासी बोली भाषेतील साहित्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला भिली आदिवासी बोली भाषेतील ते देशातील एकमेव सन्मानार्थी ठरले आहेत सुनील गायकवाड हे कजगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तसेच ते विस वर्षाहुन अधिक काळापासून आदिवासी साहित्य लिहीत असून आता पर्यंत त्यांच्या अहिराणी बोली भाषेवरील व भिली आदिवासी हिंदी मराठी भाषेवरील अनेक साहित्य प्रकाशित झाले आहे त्यांना मिळालेल्या सन्मानानाबद्दल त्यांचे सर्वच स्थरावरून अभिनंदन होत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम