आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत मु. जे. आणि के. सी. ई. शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय विजयी

बातमी शेअर करा...

आंतर महाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धेत मु. जे. आणि के. सी. ई. शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय विजयी

जळगाव : येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात जळगाव विभाग आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल पुरुष आणि महिला गटाच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत पुरुष 6 आणि महिला 6 संघाच्या 140 खेळाडूनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर चौधरी यांचे हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, डॉ. पी. आर. चौधरी, जळगाव क्रीडा विभागाचे सचिव डॉ. सुभाष वानखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडा संचालिका डॉ. अनिता कोल्हे यांनी केले. डॉ. योगेश महाजन, अमर हटकर, डॉ. नीलिमा पाटील,सागर सोनावणे, हिमाली बोरोले, प्रणव बेलोरकर संघ व्यस्थापक म्हणून उपस्थित होते.स्पर्धेसाठी पंच म्हणून वाल्मिक, सोनाली वाल्मिक,यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल :-
*पुरुष गट :* –
विजयी :- मु. जे. महाविद्यालय.
उपविजयी :- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
तृतीय :- जी. एच. रायसोनी महाविद्यालय
चतुर्थ :- के. सी. ई. आय. एम. आर. महाविद्यालय
*महिला गट :*
विजयी :- के. सी. ई. शारीरिक शिक्षणशस्त्र महाविद्यालय.
उपविजयी :- जी.एच. रायसोनी महाविद्यालय
तृतीय :- मु. जे. महाविद्यालय
चतुर्थ : अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय
स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम