
“*आईच्या नावे एक झाड : कन्यांच्या वृक्षारोपण मोहिमेत प्रेम,श्रद्धा आणि पर्यावरणाचा सुरेख संगम”*
जळगाव राज्य वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग जळगाव व,जशमनपा यांच्या संयुक्त विद्यमाने, के. के. उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या ‘इको क्लब’ तर्फे “आईच्या नावे एक झाड,कन्यांच्या हस्ते” या भावनिक संकल्पनेतून वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.या उपक्रमांतर्गत जळगाव येथील नवे वसाहत उस्मानिया पार्क परिसरात विविध ठिकाणी एकूण ७० झाडांची लागवड करण्यात आली.या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ.तन्वीर जहां शेख यांनी वृक्षारोपणाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,झाडे ही केवळ पर्यावरणाची शोभा नसून ती आपल्या पुढच्या पिढ्यांची अमानत आहेत.या अमानतीची जपणूक करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे.लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी स्थानिक रहिवाशांना देण्यात आली, जेणेकरून हा पुण्यसंचय दीर्घकाळ टिकून राहील.
“आईच्या नावे एक झाड” हा घोषवाक्य ऐकून विद्यार्थिनींसह उपस्थित नागरिक भावुक झाले व वातावरण भक्तिभावाने भारून गेले.या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेने चे लईक़ अहमद शाह,अर्शिया शेख व इको क्लबच्या सदस्यांनी परिश्रमपूर्वक योगदान दिले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम