आपल्या शेतातील उभा ऊस पाहून शेतकरी चांगलाच वैतागला

कजगाव ता भडगाव सध्या ऊस उत्पादक शेतकरी हे आपल्या शेतातील उभा ऊस पाहून चांगलेच वैतागले आहेत कजगाव सह परीसरातील अनेक शेतात ऊस अजूनही पडून आहे उभ्या उसाला कारखाना विचारीत नसल्याने हा ऊस आता नेमका काय करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे कारखान्याने ऊस उचलण्यात आखडता हात घेतल्याने परीसरातील अनेक शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत दिसून येत आहे वेळोवेळी विनंती करूनही कुठलाच साखर कारखाना हा ऊस घेण्यास तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना लाख मोलाचा ऊस आता पशूंना देण्यावाचून दुसरा पर्याय नाही तर अनेक शेतकऱ्यांनी घरीच उसाची कटाई करून ऊस जनावरांच्या स्वाधीन केल्याचे दिसून येते त्यामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसल्याचे दिसून येत आहे कजगाव परीसरात यंदा अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली होती अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमानावर ऊस लागवड केल्याने यंदा ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले होते मात्र लागवळ केलेल्या उसाला आता मागणीच नसल्याने शेतकऱ्यांनी कपाळावर हात मारला आहे त्यामुळे लवकरच हा ऊस कारखान्याने उचलून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी जोरदार होत आहे """':आर्थिक देणे घेणे शिवाय ऊस उचलण्यास ना दरम्यान गावातील व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक हेक्टर शेतातील ऊस हा तसाच पडून आहे शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस घेण्यास कारखान्याने आखडता हात घेतल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तर अनेक शेतकऱ्यांकडे ऊस घेण्यासंबंधीत काही तथाकथित लोकांनी पैसे मागितल्याची चर्चा राजरोसपणे होतांना दिसत आहे तर अनेकांनी आपल्या शेतातील ऊस कटाई साठी काही रक्कम दिल्याचे ही दिसून येते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस हा आर्थिक देवाणघेवानिला नकार दिल्याने तसाच पडून असल्याचे दिसून येते यावर आता संबंधित प्रशासनाने ठोस तोडगा काढावा असा सूर शेतकऱ्यांमधून व्यक्त होतांना दिसत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम