आमदार किशोर आप्पा पाटील मंत्री व्हावेत म्हणून शिवसैनिकांची प्रभू श्रीरामचंद्र चरणी महाआरती

पाचोरा-भडगावच्या विकासासाठी शिवसैनिकांची मंत्रिमंडळात स्थानासाठी प्रार्थना

बातमी शेअर करा...

आमदार किशोर आप्पा पाटील मंत्री व्हावेत म्हणून शिवसैनिकांची प्रभू श्रीरामचंद्र चरणी महाआरती

पाचोरा-भडगावच्या विकासासाठी शिवसैनिकांची मंत्रिमंडळात स्थानासाठी प्रार्थना

भडगाव / प्रतिनिधी
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किशोर आप्पा पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी भडगावात प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांचे साकडे घातले. तेथे शिवसैनिकांनी महाआरती केली.
भडगाव येथील बाजार चौकातील प्रभू श्री राम मंदिरात आमदार किशोर आप्पा पाटील यांना जनतेने भरघोष मतांनी विजयी केले. सलग तिसऱ्या वेळेस जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे.
आमदार
आमदार
त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघाच्या विकासाठी किशोर पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. शिवसेना-युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भडगाव येथील बाजार चौकातील मंदिर प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी शिवसैनिकांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी साकडे घातले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शहर प्रमुख बबलू देवरे, आबा चौधरी, अतुल परदेशी,जगन भोई,संतोष महाजन, दादा भोई, संभाजी पाटील, नाना हाडपे, प्रदीप महाजन, नितीन महाजन, दुर्गेश वाघ, निलेश चव्हाण नागेश वाग,
आबा महाजन, मंदार कासार, रवी आहिरे, अमोल पाखले, राजू आहिरे, रवी सोनार, सुनील भोई महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रत्ना पाटील, शहर प्रमुख भारती माळी, सीमा महाजन, सुनंदा राजपूत, जया महाजन, राजश्री वाणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
51 नारळ फोडून नवस फेडला
शिवसेनेचे महेंद्र ततार यांनी आमदार किशोर आप्पा पाटील हे सलग तिसऱ्या वेळी निवडून यावे म्हणून 51 नारळ वाढवण्याचा नवस केलेला होता. तो नवस आज पुर्ण करण्यात आला.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीराम मंदिरात नारळ फोडून नवस पुर्ण केला. तर किशोर आप्पा पाटील हे मंत्री व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यात आली.
हे ही वाचा👇
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम