
आसेम तर्फे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
आसेम तर्फे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
पंचायत समितीच्या सभागृहात आदिवासी सेवा मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षकांना पुरस्कार व आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील आदिवासी, भटक्या-विमुक्त, ओबीसी तसेच सर्व समाजातील १० उत्कृष्ट शिक्षकांना “आद्य क्रांतीकारी तंट्या मामा भिल्ल आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षकांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
दहावी, बारावी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि विविध स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, प्रशस्तीपत्र आणि मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
आदिवासी सेवा मंडळाचा समाजसेवेतील मोलाचा वाटा
आदिवासी सेवा मंडळ ही एक सेवाभावी संघटना असून तिला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या मंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्यात आतापर्यंत १,८२८ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य मासूम तडवी, आसेम संस्थापक राजू बिराम तडवी, कर्मचारी संघ प्रदेशाध्यक्ष इरफान तडवी, तसेच मंडळ अधिकारी हनिफ आप्पा, प्रसिद्धी प्रमुख मन्सूर तडवी, शिक्षक अध्यक्ष श्रीकांत मोटे सर, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यावल येथील प्रसिद्ध फोटो व्यवसायिक शब्बीर मुसा पटेल (ठाकूर) आणि मुबारक गुरुजी यांचा विशेष सत्कार करण्यात आल

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम