इनरव्हील ईस्ट व रोटरीतर्फे ५०० मुलांना स्टीलच्या डब्यांचे वाटप

बातमी शेअर करा...
इनरव्हील ईस्ट व रोटरीतर्फे ५०० मुलांना स्टीलच्या डब्यांचे वाटप
जळगाव । इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्ट व रोटरी क्लब ऑफ जळगावतर्फे प्लास्टिकमुक्त जनजागृतीबाबत उपक्रम राबविण्यात आला. यात शहरातील बालनिकेतन विद्यामंदीर येथे मुलांना प्लास्टिकचा डबा वापरण्याऐवजी स्टीलचा डबा वापरा याबाबत सांगण्यात आले. विद्यालयातील पाचशे मुलांना स्टीलच्या डब्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन गिरीश कुलकर्णी, माजी अध्यक्ष रोटेरियन संदीप शर्मा, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या डिस्ट्रीक्ट प्रोजेक्ट कमिटी चेअर पीडीसी संगीता घोडगावकर यांसह अध्यक्ष सिमरन पाटील, सचिव रितू शर्मा, सदस्या वृषाली व्यवहारे, स्मिता बियाणी, रेखा वाणी, माधुरी वाणी, पायल जैन, वैष्णवी साळवे, साधना पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमात मुलांना प्लास्टिक वापराचे परिणाम तसेच ते पर्यावरणासाठी किती हानिकारक आहे याबाबत माहिती देण्यात आली. मुलांनी प्लास्टिकच्या डब्यांचा वापर टाळावा याकरिता स्टीलच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच इनरव्हील क्लबतर्फे शिक्षकांना प्रमाणपत्राचे देखील वाटप सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम