
उदघाटने – चोपडा तालुक्यात आ. लताताई व माजी कार्यसम्राट आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी विविध विकासकामांची उदघाटने
तालुक्यातील शिवसैनिकांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती
उदघाटने – चोपडा तालुक्यात आ. लताताई व माजी कार्यसम्राट आ. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांनी विविध विकासकामांची उदघाटने
तालुक्यातील शिवसैनिकांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती
चोपडा l प्रतिनिधी
तालुक्यात विविध ठिकाणी कार्यसम्राट आमदार ताई सो. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी कार्यसम्राट आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध प्रकारची विकास कामे जनसामान्यांसाठी शासन स्तरावर अथक परिश्रम करीत मंजूर करून आणली आहेत.
हे हि वाचा👇
या कामांमध्ये वेले येथे काँक्रीटीकरण करणेसाठी 10 लक्ष रू., आखतवाडे येथे 10 लाख रु., चहार्डी येथे काँक्रीटीकरण करणेसाठी 10 लक्ष रू. व सभामंडप बांधनेसाठी 5 लक्ष रू., घाडवेल येथे काँक्रीटीकरण करणेसाठी 10 लक्ष रू, धूपे बु.येथे सभामंडप बांधनेसाठी 5 लक्ष रू. व काँक्रीटीकरण करणेसाठी 5 लक्ष रू.
तसेच धूपे खु.येथे सभागृह बांधणेसाठी 30 लक्ष रू. व सभामंडप बांधणेसाठी 5 लक्ष रू, तसेच विचखेडा येथे काँक्रीटीकरण करणेसाठी 10 लक्ष व सामाजिक सभागृह लोकार्पण 20 लक्ष रू. मंजुर करण्यात आले होते.

या सर्व विकास कामांचे मंगळवारी मान्यवरांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, संचालक शिवराज पाटील, संचालक विजय पाटील,

माजी उप नगराध्यक्ष विकास पाटील, निवृत्ती पाटील सर, संतोष पाटील, अशोक पाटील, संदीप पाटील, मालखेडा सरपंच गणेश पाटील, किशोर पाटील, शिवाजी कोळी, संदीप कोळी तसेच गावातील शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे हि वाचा👇

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम