
उधारीच्या पैशांवरून तरुणाला बेदम झोडपले
डोक्यात पाईप टाकून केली गंभीर इजा ; जळगावातील घटना
उधारीच्या पैशांवरून तरुणाला बेदम झोडपले
डोक्यात पाईप टाकून केली गंभीर इजा ; जळगावातील घटना
जळगाव प्रतिनिधी I
उधारीचे पैसे अगील्याच्या रागातून एका तरुणाला बेदम माथां करून त्याच्या डोक्यात पाईपने मारून गंभीर इजा केल्याची घटना शहरातील मोहन टॉकीज परिसरात गुरुवार २३ जानेवारी रोजी घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव सुभाष सोनवणे वय २९ याने विनोद भावलाल सोनवणे याला उधारीने पैसे दिले असल्याने त्याने ते . गुरूवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता पैसे घेण्यासाठी विनोद सोनवणे याच्या घरी गेला. त्यावेळी गौरव सोनवणे याने उधारीचे पैसे मागितले याचा राग आल्याने विनोद सोनवणे याने शिवीगाळ करत छातीवर मारहाण करून लोखंडी पाईप डोक्यात टाकून गंभीर जखमी केले. जखमी तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या गौरव सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम