
एकलव्य क्रीडा संकुलात महाराष्ट्रीयन लोककला लावणी नृत्य स्पर्धा २०२५ उत्साहात
स्पर्धेत एकूण २० संघाचा सहभाग
एकलव्य क्रीडा संकुलात महाराष्ट्रीयन लोककला लावणी नृत्य स्पर्धा २०२५ उत्साहात
स्पर्धेत एकूण २० संघाचा सहभाग
जळगाव,;- भारतीय खेल प्राधिकरण, पश्चिम विभागीय केंद्र आणि खेलो इंडिया यांच्या FIT INDIA उपक्रमाअंतर्गत शालेयस्तर व खुल्या गटांकरिता एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे महाराष्ट्रीयन पारंपरिक लोककला लावणी नृत्य स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २० संघांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे राजेंद्र ठाकरे, डॉ. रणजीत पाटील, प्रसाद देसाई, नृत्य कला विभागाचे अजय शिंदे, ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिती झांबरे, मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे, के.सी.ई. शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. प्रणव बेलोरकर, प्रा. प्रवीण कोल्हे तसेच कार्यक्रमाचे परीक्षक सचिन भिडे, स्वप्नाली तायडे व विनोद ढगे उपस्थित होते.
सदर स्पर्धा शालेय व खुल्या गटात विभागून घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिक, ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सहभागी सर्व संघांना प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेचे विजेते:
शालेय गट:
प्रथम – आविष्कार लावणी ग्रुप, यावल
द्वितीय – अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव
तृतीय – ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव
खुला गट:
प्रथम – कान्ह ललित केंद्र, एम. जे. कॉलेज, जळगाव
द्वितीय – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव
तृतीय – थाट कस्तुरीचा ग्रुप, जळगाव
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र नारखेडे, चंद्रलेखा जगताप, वसंत सोनवणे, निलेश खडके तसेच सर्व एकलव्य क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बक्षीस वितरण कार्यक्रमास जिल्हा समाज अधिकारी योगेश पाटील, बँक ऑफ महाराष्ट्रचे रिजनल ऑफिसर प्रवीण कुमार आणि श्रीमान बडगुजर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम