एसटीचे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी रावेरला धनगर समाजाचे “रास्तारोको” आंदोलन
मेंढपाळ बांधव मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलनात सहभागी
रावेर –
धनगर समाजाला एसटीचे जात प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजातर्फे शासकीय विश्रामगृहाजवळ बुरहानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मेंढपाळ बांधव मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन सहभागी झाले .
तालुक्यातील धनगर समाज्यातर्फे रावेर येथे बुरहानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली.सुमारे एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यावेळी धनगर समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. धनगर आणि धनगड हे एकच असल्याने, केंद्र आणि राज्य सरकारने याची दखल घेऊन देशभरात धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांतर्फे यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना देण्यात आले.
—
यांनी घेतला आंदोलनात सहभाग
धनगर समाजाचे जेष्ठ नेते सुरेश धनके, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप सावळे, बाजार समिती संचालक जयेश कुयटे, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सावळे, गणेश बोरसे, डॉ भगवान कुयटे, अॅड. प्रविण पाचपोहे,अड. बि. डी. निळे,हिलाल सोनवणे, लक्ष्मण सावळे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तुषार कचरे, शुभम नमायते , स्वप्नील लासुरकर, ज्ञानेश्वर केळकर, दिलीप अजलसोंडे, दिगंबर बोरसे ,शालिक सावळे, प्रवीण सावळे, रमेश सावळे, ईश्वर निळे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
–
यांनी ठेवला बंदोबस्त
उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोका. प्रमोद पाटील, सचिन घुगे , विशाल पाटील, समाधान ठाकूर, राहुल परदेशी, चैतन्य पाटील आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम