ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलमध्ये मनशक्ती केंद्राची कार्यशाळा उत्साहात

बातमी शेअर करा...

चोपडा l प्रतिनिधी

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी लोणावळा येथील मनशक्ती केंद्रामार्फत कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

मनशक्ती केंद्राचे साधक अजित फाफळे यांनी शिक्षकांना शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी अनमोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिक्षकांचे व्यस्त शिक्षक, त्रस्त शिक्षक, सुस्त शिक्षक आणि मस्त शिक्षक असे चार प्रकार असून यांविषयी सविस्तर माहिती दिली.

मुलांचे चारित्र्य घडविण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. मुलांचे दुसरे घर म्हणजे शाळा आणि मुलांचे दुसरे पालक म्हणजे शिक्षक होय. विद्यार्थ्यांची प्रतिभा खुलवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वातावरण निर्मितीच्या प्रक्रियेविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

वरगव्हाण येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

बालक, पालक आणि शिक्षक यांचे त्रिकोण न राहता वर्तुळ झाले तर समस्या सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल आणि मनशक्ती केंद्राचे साधक व्ही. आर. जोशी, अभय खांदे, अनिल अत्तरदे उपस्थित होते.

इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी ‘ताणमुक्ती व विद्यार्थी समस्या आणि उपाय’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या समस्या, भावनिक व मानसिक समस्या यांचा समतोल कसा राखावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

संस्कारी मुल आणि सुजाण नागरिक बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण कसे वृद्धिंगत करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. वेळेचे नियोजन, आहार व विहार यांचा समतोल राखण्यासाठीचे उपाय विद्यार्थ्यांना सुचविण्यात आले.

अभ्यासासोबतच ताण तणावाचे नियंत्रण कसे करावे यासाठी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला तनुजा देवधर, छाया पाटील आणि सागर चंदने यांनी मार्गदर्शन केले

ताण-तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आणि मेंदूचे डावा व उजवा हे दोन्ही भाग क्रियाशील बनवण्यासाठी अनोख्या माईंड जीमची रचना शाळेत करण्यात आली. उजव्या आणि डाव्या मेंदूच्या क्षमता वाढण्यासाठी, विकास होण्यासाठी माईंड जीम ऍक्टिव्हिटीजचे आयोजन करण्यात आले.

डाव्या मेंदूची लॉजिकल थिंकिंग आणि उजव्या मेंदूची प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी वाढवणे ही या ऍक्टिव्हिटी मागची विचारसरणी आहे. हे विविध खेळ खेळताना लॉजिकल थिंकिंग त्याचप्रमाणे सिक्वेन्शिअल थिंकिंग, ऑर्गनायझिंग स्किल, फाईन मोटर स्किल या डाव्या मेंदूच्या क्षमतांसोबत क्रिएटिव्हिटी, पॅटर्न फाइंडिंग कपॅसिटी, हॉलिस्टिक थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल या उजवा मेंदूच्या क्षमता वापरल्या जातात.

मुलांचा मोबाईल टाईम कमी होऊन एकाग्रता, स्थिरता, सावधानता वाढण्यास मदत होते.

या अनोख्या कार्यशाळेला संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील,शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे आणि डी. एस. पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका अश्विनी पाटील आणि आभार प्रदर्शन दिप्ती पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम