ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

'कार्निवल २०२४-२४' मधून भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे अनोखे दर्शन

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि १३ जानेवारी २०२४

ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

चोपडा – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन – ‘कार्निवल २०२४-२४’ मधून भारताच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे अनोखे दर्शन घडविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. स्वागतगीत आणि गणेश वंदना सादर करण्यात आली. याप्रसंगी डॉ. प्रदीप लासुरकर ( तालुका हेल्थ ऑफिसर, चोपडा), संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील,

स्नेहा पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. सोनाली बारेला, डॉ. अतुल पाटील, डॉ. पराग पाटील, डॉ. अमोल पाटील, अनिल पाटील, नितीन जैन, नरेंद्र तोतला, विनोद टाटिया, ज्योती टाटिया, तुळशीराम पाटील, गणेश पाटील, गणेश बुआ (ए.पी.आय. अडावद), प्रा. दीनानाथ पाटील,

ऑक्सफर्ड स्कूलच्या प्रा. डी. जी. सोमानी, शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस. सोनवणे, प्रा. विलास दारुंटे, प्रा. अशोक साळुंखे यांचे देखील सहकार्य लाभले.

चोपडा तालुक्याचे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर अविनाश सदाशिव पाटील आणि संस्थेच्या उपाध्यक्षा आशाताई पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना ऑक्सफर्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मांडली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रदीप प्रभाकर लासुरकर आणि संस्थेचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

ऑक्सफर्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी शाळेच्या यशस्वी उपक्रमांबद्दल आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशासंदर्भात माहिती दिली.

शाळेतील विद्यार्थी प्रमुख पूर्वी अग्रवाल, मोहित पाटील यांनी मनोगत वक्त केले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध स्तरावर प्राप्त केलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी बक्षीस वितरण करण्यात आले.

ऑक्सफर्ड स्कूलच्या २०२१ साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थी मेडिकल कॉलेज, चार विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज, दोन विद्यार्थी बी.बी.ए, एक विद्यार्थी मर्चंट नेव्ही तर इतर विद्यार्थी डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, कंप्यूटर इंजीनियरिंग यांसारख्या विविध नामांकित शाखांमध्ये प्रवेशित झाले आहेत.

या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय स्नेहसंमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. २०२२ साली उत्तीर्ण झालेल्या युग महावीर जैन ( प्रथम क्रमांक), निखिल गोपाल महाजन (द्वित्तीय क्रमांक) आणि यज्ञेश राजेश लांडगे (तृतीय क्रमांक) या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मॅथेक्स या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दक्ष प्रवीण जयस्वाल या विद्यार्थ्यांचा आणि रंगोत्सव सेलिब्रेशनने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेत वर्ल्ड स्पेक्टॅक्युलर अवॉर्ड प्राप्त केलेल्या संचिता संजय बारी या विद्यार्थिनीचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

रंगोत्सव सेलिब्रेशन : ऑर्गनायझेशन फॉर नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन, या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेमध्ये रंगभरण कोलाज सुंदर हस्ताक्षर टॅटू मेकिंग या विविध कला प्रकारामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांना या समारंभात सन्मानित करण्यात आले. कलाशिक्षक देवेन बारी यांना रंगोत्सव तर्फे कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि प्रिन्सिपल ममता कपिल न्याती यांना रंगोत्सव तर्फे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भगवान राम आणि कृष्ण तसेच शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित नाटिकांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विविध खेळ ते चंद्रयानापर्यंतच्या नाविन्यपूर्ण विविध संकल्पना विद्यार्थ्यांनी विविध नाटिका आणि नृत्यातून सादर केल्या.

पूर्व प्राथमिक विभाग ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आणि नाटिकांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन पटेल, दीप्ती पाटील, कल्पना बारी, जयश्री सूर्यवंशी, अश्विनी पाटील, विशाल मराठे आणि सारिका पवार या शिक्षकांनी व इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वरांगी अहिरे आणि वैशाली गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. शाळेतील नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांनी विविध नृत्य प्रकारांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्वागत गीतासाठी शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

हे वाचा👇

चोपडा महाविद्यालयात ‘युवा मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम