
ऑनलाईन गेमिंगचे अमिष दाखवून ठेकेदाराला ७९ लाखांना गंडा
पाचोऱ्यातील प्रकाराने खळबळ ; गुन्हा दाखल
ऑनलाईन गेमिंगचे अमिष दाखवून ठेकेदाराला ७९ लाखांना गंडा
पाचोऱ्यातील प्रकाराने खळबळ ; गुन्हा दाखल
जळगाव I प्रतिनिधी
ऑनलाईन गेमिंगचे अमिष दाखवून एका शासकीय ठेकेदाराची ७८ लाख ९० हजारात ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना दि. ३ नोव्हेंबर २०२४ ते दि. १२ जानेवारी रोजी दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन जणांनी व्हाट्सपवर पाचीरा येथील शासकीय ठेकेदार रोशन पाटील यांच्यासोबत दि. ३ नोव्हेंबरपासून संपर्क साधून एका वेबसाईटवरील ‘अंदर बाहर’ व ‘अंदर बाहर २’ हे गेम खेळल्यास मोठ्या प्रमाणात पैसे जिंकू शकतात, असे अमिष दाखविले. त्यानुसार शासकीय ठेकेदाराने ऑनलाईन गेम खेळण्यास सुरुवात केल्यानंतर त्यात ते जिंकल्याचे भासवून त्यांच्या बँक खात्यात सात लाख रुपये जमा केले.
त्यातून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्यांना अधिक पैसे गुंतविण्याचे अमिष दाखवून सदर गेम खेळण्यास सांगितले. त्यानुसार ते वेळोवेळी हा ऑनलाईन गेम खेळत गेले. त्याच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी रक्कम उकळण्यास सुरुवात केली. तसेच नेटबंकिंगद्वारे त्यांच्याकडून एकूण ७८ लाख ९० हजार ५०० रुपये स्वीकारण्यात आले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक सतीश गोराडे पुढील तपास करीत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम