कच्छी जैन समाजाकडून सुनील भाऊ चौधरी यांचा गौरव
कच्छच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींची विशेष उपस्थिती
कच्छी जैन समाजाकडून सुनील भाऊ चौधरी यांचा गौरव
कच्छच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींची विशेष उपस्थिती
अंबरनाथ जैन समितीचे प्रमुख विसनजीभाई डेढिया उपस्थित
मुलुंड – मुंबई । प्रतिनिधी
मुलुंड येथे शनिवार दि. 4 जानेवारी रोजी भव्य महापूजनाच्या निमित्ताने कच्छी जैन समाजाकडून सुनील भाऊ चौधरी यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
या प्रसंगी कच्छच्या विविध भागांमधून आलेल्या मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाला अंबरनाथ मुंबई जैन समितीचे प्रमुख श्री विसंजीभाई डेढिया विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
महापूजन मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडले, ज्यामध्ये “जैनम जयति शासनम” या जयघोषांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
कच्छी जैन समाजाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाने समाजातील विविध घटकांना एकत्र आणून धार्मिक व आध्यात्मिक भावनेला चालना देण्याचे काम केले.
हे ही वाचा👇
कृतज्ञता सोहळ्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भव्य सत्कार
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम