कजगावला उद्योजक नितीन धाडीवाल यांच्याकडून ‘अमर रथ’ भेट

बातमी शेअर करा...

कजगाव, ता. भडगाव: “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या उदात्त भावनेतून, कजगाव येथील उद्योजक नितीन नंदलाल धाडीवाल यांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या, नंदलाल मोतीलाल धाडीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावाला एक ‘अमर रथ’ (अंतिम संस्कारासाठी वापरण्यात येणारा रथ) भेट दिला आहे. गावासाठी लोकार्पण करण्यात आलेला हा पहिलाच रथ असल्याने नितीन धाडीवाल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या ‘अमर रथा’चे लोकार्पण सरपंच रघुनाथ महाजन आणि नितीन धाडीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेंद्र चव्हाण, अनिल महाजन, विजय पोतदार, कैलास महाजन, पुंडलिक सोनवणे, विजय गायकवाड, प्रकाश पाटील, अनिल पाटील, दिनेश धाडीवाल, दशरथ पाटील, पृथ्वीराज पाटील, चेतन धाडीवाल, मुन्ना चोरडिया, दिनेश टेलर, बापू महाजन, रवींद्र पाटील, भागवत महाजन, सुनील महाजन, भिकन महाजन, विकास महाजन, राकेश महाजन यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम