कजगावात वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरूच

कजगावात वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरूच,पिकांच्या रक्षणासाठी बळीराजा जागा वनविभाग मात्र झोपेतच कजगाव ता भडगाव येथे वन्य प्राण्यांचा उपद्रव सुरूच असून कजगाव सह परीसरातील अनेक खेड्यावरील असंख्य शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर शेत जमिनीवरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे बरळ भागात हा उपद्रव काही प्रमाणावर जास्त दिसून येतो त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसरात्र आपल्या पीकांच्या रखवालीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी मात्र रडकुंडीला आलेला आहे त्यामुळे ह्या मोकाट वन्यप्राण्यांचा बंदोबस्त त्वरित करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कजगाव येथील शेतकरी भगवान पुंडलिक महाजन यांच्या शेतातील कपाशी चे पीक वन्यप्राण्यांनी जमीनदोस्त केल्याचे दिसून येते महाजन यांचे काही गुंठे क्षेत्रावरील कपाशी चे पीक वन्यप्राण्यानी जमीनदोस्त केले आहे तसेच ह्याच भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका ज्वारी बाजरी व अन्य पिकांनाही वन्यप्राण्यांनि टार्गेट केले आहे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या येणाऱ्या उत्पन्नावरही मोठा परीणाम होणार आहे अश्याच पद्धतीने दरवर्षी होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे ह्या वन्यप्राण्यांचा उपद्रवाला त्वरित आळा घालावा अशी मागणी जोरदार होत आहे """':मागील नुकसानीची अद्याप भरपाई नाही दरम्यान दरवर्षी वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे बळीराजा मोठ्या संकटात असतांना वनविभाग मात्र ह्या गंभीर बाबीची कुठलीच दखल घेत नसून शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागणी करूनही शेतकऱ्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात आहे त्यातच मागील वर्षी ही अश्याच पद्धतींने वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्याचा पंचांमा ही झाला मात्र अजूनही त्या नुकसानीची मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे मागील वर्षाची व यंदाच्या वर्षाची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी जोरदार होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम