कजगाव येथील महादेव मंदिरात चोरी

कजगाव महादेव मंदिरात चोरी कजगाव ता भडगाव येथील स्टेशन रस्त्यावरील जुने शाळे जवळील महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील काही साहित्य चोरून नेले आहे जुन्या शाळेजवळील महादेव मंदिरात अज्ञात भामट्यांनी मंदिरातील भजनासाठी वापरण्यात येणारे सहा हजार रुपये किमतीचे एम्लिफायर दोन किलोचा पितळी घंटा एक तांबेचा तांब्या घागरी वरचे पितळी झाकण अश्या वस्तू चोरून नेल्या आहेत तसेच भामट्यांनि मंदिरातील दोन्ही कपाटाचे कुलूप तोडून समान वास्तव्यास केल्याचे दिसून आले यापूर्वी मंदिरात तब्बल पाच ते सहा वेळेस चोरी झालेली आहे नेहमी होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तरी ह्या वारंवार होणाऱ्या चोरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्वरित तपास चक्रे फिरवून चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी जोरदार होत आहे

advt office
बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम