कजगाव येथे अनेक शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांनी अक्षरक्ष जेरीस आणले

कजगाव ता भडगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांनी अक्षरक्ष जेरीस आणले आहे मात्र यावर वनविभागाने सोयिस्करपने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे वन विभागाबद्दल तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने ह्या मोकाट वन्य प्राणांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोरदार होत आहे कजगाव परीसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती ह्या वनविभागाच्या हद्दीला लागून आहेत त्यामुळे साहजिकच तेथे वन्यप्राण्यांचा वावर असतो मात्र आता हा वन्यप्राण्यांचा मुक्त वावर बळीराजाला घातक ठरत आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी मका ज्वारी बाजरी आदिं पिकांची लागवळ केली आहे मात्र ह्या पिकांना वन्यप्राण्यांनि मोठे नुकसान पोहचवले आहे अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पिके वन्यप्राण्यांनी जमीनदोस्त केल्याच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे त्यामुळे ह्या वन्यप्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोरदार होत आहे """:वन खात्याचे दुर्लक्ष दरम्यान वाढत्या वन्यप्राण्यांच्या तक्रारीकडे वन खात्याने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही वन खात्याने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या तक्रारीकडे वन खात्याने कानाडोळा केला असून त्यांचा आतापर्यंत कुठलाच बंदोबस्त करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीच्या ठरणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम