कजगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | 29 जुलै 2022 |कजगाव ता भडगाव येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी  करण्यात आली,
तसेच सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलेल्या हरिनाम कीर्तन सप्ताहाची ही सांगता काल्याचे कीर्तनाने करण्यात आली, संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्तानें संत सावता महाराज मंदिरा पासून ते संपूर्ण गावात सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन माजी पोलीस उपनिरीक्षक पोपट पुंडलिक महाजन व युवा उद्योजक सचिन महाजन यांच्याकडून करण्यात आले होते यावेळी माजी शिक्षण सभापती एकनाथ महाजन माळी समाजाचे माजी अध्यक्ष विक्रम महाजन माळी समाजाचे नेते रघुनाथ महाजन, ग्रा प सदस्य अनिल टेलर, हिलाल चौधरी, माजी उपसरपंच भानुदास महाजन, माजी ग्रा प सदस्य अनिल महाजन, आबा महाजन, कैलास महाजन, भिकन महाजन, भीमराव महाजन, राजेंद्र चव्हाण, रविंद्र महाजन, संजय महाजन, भगवान महाजन, राजेंद्र चौधरी, रघुनाथ जाधव, व असंख्य माळी समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम