कजगाव सेंट्रल बँकेत कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी

कजगाव सेंट्रल बँकेत कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी,खासदार आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज कजगाव ता भडगाव येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ग्रामस्थांची अनेक कामे खोळंबली आहेत अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा कामाचा व्याप शाखा अधिकाऱ्यासह अन्य कर्मचाऱ्याना सोसावा लागत आहे त्यामुळे अपूर्ण कर्मचाऱ्यांची संख्य त्वरित वाढवावी अशी मागणी खातेदारांकडून होत आहे कजगाव येथील सेंट्रल बँक ही गावातील नेहमी गर्दी असणारी बँक आहे कजगाव सह अनेक खेड्यांचा व्यवहार ह्या बँकेवर अवलंबून आहे त्यामुळे येथील बँकेत आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतो त्यामुळे बँकेच्या कामासंदर्भात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते मात्र वाढती गर्दी व अपूर्ण कर्मचारी संख्यामुळे खातेदारांना बराच वेळ थांबून राहावे लागते याचा सर्वच भार येथील शाखा व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर दिसून येतो त्यामुळे खातेदारांची कामे करतांना कर्मचारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे सेन्ट्रल बँक शाखेत कर्मचारी वर्गाची संख्या वाढवावी अशी मागणी जोरदार होत आहे "":कमी कर्मचाऱ्यामुळे खातेदारांसह बँक कर्मचाऱ्यांचे हाल दरम्यान येथील सेन्ट्रल बँकेच्या शाखेत अनेक खेड्यावरील नागरिकांचा आर्थिक व्यवहार असल्याने अनेक लोक आपली दैनंदिन कामे सोडून बँकेच्या कामासाठी येतात मात्र बँकेत अपूर्ण कर्मचारी संख्येमुळे अनेकांना तासंतास उभे राहावे लागते त्यामुळे खातेदारांनी नाराजी व्यक्त केली आहे तर अपूर्ण कर्मचारी वर्गामुळे बँकेतील अन्य कर्मचाऱ्यांना खातेदांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्यामुळे कजगाव सेन्ट्रल बँकेच्या शाखेत कर्मचारी संख्या लवकरात लवकर वाढवावी अशी मागणी जोरदार होत आहे "":वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज दरम्यान कजगाव येथील सेंट्रल बँकेत अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे खातेदारांची अनेक कामे खोळंबली असतात जर कर्मचारी संख्या जास्त असेलतर कामाचा वेग ही वाढतो व गर्दीचे प्रमाणही कमी होत जाते त्यामुळे वाढत्या गर्दीकडे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे बँकेतील गर्दीमुळे जेष्ठ नागरिकांसह अनेकांना बराच वेळ काम होण्यासाठी वाट पाहावी लागते बँकेत मंजूर कर्मचारी संख्येपेक्षा अनेक कर्मचारी कमी असल्याने त्याचा परिणाम हा बँकेच्या कामावर दिसून येतो तर अनेक वेळा नाराजीचा सुरू वादात रुपांतरीत होत असतो त्यामुळे कर्मचारी संख्या वाढविल्यास खातेदारांना वेळीवेळी उत्तम सेवा मिळू शकते त्यामुळे खासदार उन्मेष पाटील व आमदार किशोर पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करून कर्मचारी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे प्रतिक्रिया कर्मचारी संख्या कमी आहे हे खरे कामाचा ताणही पडतो मात्र आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांची सेवा योग्यपणे करण्याचा प्रयत्न करीत असतो तसेच कमी कर्मचारी संख्येबाबत वरिष्ठांना कर्मचारी संख्या वाढवण्याची विनंती केली आहे लवकरच कर्मचारी संख्या वाढणार असल्याचे वरिष्ठांकडू सांगण्यात आले आहे सुरेश कुमार सेंट्रल बँक शाखा व्यवस्थापक कजगाव

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम