
कत्तलीसाठी गायींना घेऊन जाणारे वाहन पकडले
दोन गायीची सुटका ; एकाला अटक ,तिघांविरुद्ध गुन्हा
कत्तलीसाठी गायींना घेऊन जाणारे वाहन पकडले
दोन गायीची सुटका ; एकाला अटक ,तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव प्रतिनिधी
कोंबलेल्या अवस्थेत अत्यंत निर्दयीपणे कत्तलीच्या उद्देशाने शिरसोली येथून दोन गायी पिंप्राळा येथे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून वाहनावरील चालकाला पकडून रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून दोन गायीची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी चालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मोहाडी ता. जळगाव येथील जितेंद्र कोळी हा २६ जानेवारी रोजी सकाळी शेख इब्राहीम शेख अब्बास शिरसोली ता. जि. जळगाव यांच्याकडील २० हजार आणि ३० हज़ार अशा ५० हजार किमतीच्या दोन गायी महेद्रा कंपनीची बोरेलो पिकअप माल वाहतुक गाडी क्र.एमएच १९ सीवाय ४४८३ ने वाहनात निर्दयपणे कोंबून भरधाव वेगाने जात असल्याचा प्रकार हरिविठ्ठल नगरीतील दिनेश रविंद्र बारी वय-29 वर्ष, धंदा-हातमजुरी, रा-हरिविष्ठ्ठलनगर, मारूती मंदीराजवळ, जळगाव यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या मित्राना आला. या वाहनाचा त्यांनी पाठलाग करून वाहनासह चालक जितेंद्र कोळी याला गिरणा पंपिंग परिसरात पकडले.
त्याला गायिंबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरे त्याने दिली नाहीत . त्यामुळे या दोन गायी पिंप्राळा शेख मुशताक शेख ईस्माइल रा. पिंप्राळा जळगाव,यांच्याकडे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचा संशय आला . रवींद्र बारी आणि त्यांच्या मित्रांनी चालकासह गायी असलेले वाहन रामानंद नगर पोलीस स्टेशनला स्वाधीन केले. रवींद्र बारी यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र गोपाळ कोळी मोहाडी ता. जि. जळगाव ,शेख इब्राहीम शेख अब्बास शिरसोली ता. जि. जळगाव शेख मुशताक शेख ईस्माइल रा. पिंप्राळा जळगाव,या तिघानाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ शरद वंजारी करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम