कनाशी येथे चैत्र पौर्णिमेचा यात्रोत्सव मोठ्या उस्तवात साजरा

कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेले श्रीक्षेत्र कनाशी हे खान्देशातील पौराणिक व ऐतिहासिक पंरपरेचा वारसा लाभलेले एक महत्त्वाचे असे पवित्र तिर्थक्षेत्र म्हणुन ओळखले जाते दरवर्षाप्रमाणे आषाढी गुरु पौर्णिमेस दाढ विशेषाचे दर्शन सोहळ्यानिमित्त भाविकांना दाढ दर्शनास ठेवण्यात येत असते हि यात्रा दि.१२ व १३ जुलै पासुन सुरु झाली दोन वर्षांच्या ब्रेक नंतर संपन्न होत असलेल्या दाढ विशेष कार्यक्रमात भाविकांची दर्शनार्थ मोठी गर्दि येथे झाली होती कोरोना व्हायरस मुळे लॉकडाउन मुळे देशातील सारेच मंदिर बंद करण्यात आली होती काहि दिवसांपूर्वी सारेच निर्बन्ध हटविण्यात आल्याने सारे मंदिर उघडण्यात आली असल्याने येथे दोन वर्षांच्या ब्रेक नंतर चैत्र पौर्णिमेचा यात्रोत्सव मोठ्या उस्तवात येथे साजरा झाला असंख्य भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दि केली होती दरवर्षी येथे दर्शनास देश विदेशातुन हजारो भाविक येत असतात """":दाढविशेषाची आख्यायिका दाढ विशेष ची आख्यायिका अशी आहे कि बाराव्या शतकात पुर्ण परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभुंनी जिणोध्दारासाठी अवतार धारण केला ते कलियुगातील श्री कृष्णाचेच अवतार मानले जातात श्री चक्रधर स्वामींचा जन्म गुजरात मध्ये झाला असला तरी त्यांनी महाराष्ट्र हीच आपली कर्मभुमी मानुन आपल्या परिश्रमाने महाराष्टाला धर्मभूमीचे व मराठी भाषेला धर्मभाषेचे स्थान त्यांनी प्राप्त करुन दिले या थोर अवतारी युग पुरुषाने पायीभ्रमण करुन शांती , समता , सहिष्णुता व मानवतेची शिकपवण करुन दिली तसेच गोदावरी परिसरातुन स्वामीचे कनाशी येथे अगमन झाले गावातिल ब्रामणाच्या विनंती वरुन स्वामी त्यांच्या घरी गेले ब्राम्हाणाने मनापासुन स्वामींची सेवा केली सेवेमुळे प्रसन्न होऊन स्वामींनी त्यांना संतती,संपती ,व ऐश्वर्य संपन्नेतचा वर दिला.त्यामुळे आजही येथे येणारे व जाणारे भाविक श्रध्दतेने नतमस्तक होवुन आपल्या मनातील इच्छा पुर्ण करतात """:दोन वर्षानंतर यात्राउत्सव साजरा दोन वर्षाच्या ब्रेक नंतर उघडलेल्या मंदिरात प्रथमताच यात्रोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले असुन जगप्रसिध्द असलेल्या श्रीक्षेत्र कनाशी येथे चैत्र यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला तर दोन वर्षांनंतर येथे दाढ विशेष हा उस्तव देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात देखील हजारो भाविक भक्त महिला बाल गोपाल मंडळी दाढ दर्शनासाठी येथे आले होते साधारण अर्धा ते एक किलोमीटर अंतरा पर्यंत भाविकांची भिज पावसात लाईन होती प्रसंगी साधुमहंत, पुजारी,ग्रामपंचायत च्या वतीने भाविक भक्ता साठी प्लास्टिक कागद (ताडपत्री)चे दर्शनासाठी च्या मार्गावर पेंडॉल उभारण्यात आले होते ग्रामस्थ,सेवेकरी यांनी भावीकभक्त साठी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या भडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, फौजदार भडगाव, चाळीसगाव शहर,चाळीसगांव ग्रामीण या तीन पोलीस स्टेशन च्या तीस पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवला दोन वर्षानंतर प्रथमताच दाढ दर्शन होणार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होईल या साठी आषाढी एकादशी पासुनच दाढ विशेष दर्शनार्थ ठेवण्यात आली होती दि.१० पासुनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दि केली तब्बल तीन दिवस भिज पावसात भाविकांची दर्शनासाठी गर्दि होती

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम