कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची गरुडझेप! रसायनशास्त्र प्रशाळेतील ३२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

बातमी शेअर करा...

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची गरुडझेप! रसायनशास्त्र प्रशाळेतील ३२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

जळगाव, दि. २२ (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एक महत्वपूर्ण यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाद्वारे आयोजित परिसर मुलाखतींमध्ये या प्रशाळेतील तब्बल ३२ विद्यार्थ्यांची नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या वार्षिक पॅकेजेसवर निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाची गाथा:

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध कंपन्यांमध्ये संधी मिळालेल्या काही प्रमुख विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांच्या निवड झालेल्या कंपन्या खालीलप्रमाणे आहेत:

  • वैष्णवी काळे, निकिता पाटील, समृध्दी पाटील, कल्याणी देसले: लाईफलाईन मेडीकल डिव्हाइसेस प्रा. लि. (छत्रपती संभाजीनगर)
  • चेतन शिंदे, यशोदीप मराठे: नोव्हा ॲग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड (तेलंगणा)
  • गौरव बास्कर: उमिया फ्लेक्सिफोम प्रा. लि. (अहमदाबाद, गुजरात)
  • मानसी पाटील: एसीएस आंतरराष्ट्रीय इंडिया प्रा. लि. (पुणे)
  • निखील भोजणे: मेडली फार्मास्युटिकल्स लिमिटेड (मुंबई)
  • निलेश पाटील: यु एस व्ही खाजगी मर्यादित (दमण, दिव)
  • प्रसाद पाटील: केवा फ्रेग्रन्सेस प्रा. लि. (मुंबई)
  • शेख रहिम शेख कलिम: इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज (इंडिया) लिमिटेड (खोपोली)
  • शार्दुल प्रकाश, नेफाडे स्नेहा राजेंद्र: साय एज ॲबसट्रॅक्ट्स (पुणे)
  • शुभम राठोड, रोहन राजपूत, निलेश निकम: सुप्रिम पेट्रोकेम लिमिटेड (रायगड)
  • सुशील मराठे, ऐश्वर्या पाटील: ड्रायकेम इंडिया प्रायव्हेट लि. (नवी मुंबई)
  • तुषार चौधरी, विजयराज जाधव: एम.पी.डी. इंडिस्ट्रोज प्रा. लि. (इंदूर)
  • विशाल निकम: मॅकडमिड एन्थोन इंडिया (पुणे)
  • वैभव गिरासे: ओरिकेम हेल्थ केअर प्रा. लि. (हरियाणा)
  • जागृती पाटील, हर्षदा गायकवाड: टाटा ऑटोमोबाईल डिव्हीजन (चाकण, पुणे)
  • डॉ. विकास पाटील: ठाकोर रिडकटन प्रायव्हेट लिमिटेड (गुजरात)
  • डॉ. अरुण काळे: अंशुल स्पेशलिटी मॉलेक्युस प्रा. लि. (मुंबई)
  • दिग्विजय गिरासे: एक्सट्रोल पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्रीज एलएलसी (यु.ए.ई.) या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत निवड.

यशाचे गमक काय?

रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. दीपक दलाल यांनी सांगितले की, विद्यापीठातील अद्ययावत दर्जेदार अभ्यासक्रम, शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष आणि संशोधन प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना नामांकित केमिकल इंडस्ट्रीजमध्ये, तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राष्ट्रीय नामांकित संशोधन संस्थांमध्ये रोजगार व संशोधनाच्या उत्तम संधी मिळत आहेत.

अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा:

निवड झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रसायनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. दीपक दलाल, पॉलिमर केमिस्ट्रीचे विभाग प्रमुख प्रा. विकास गीते, आणि रसायनशास्त्र प्रशाळेचे समन्वयक डॉ. अमरदिप पाटील यांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. नियुक्ती कक्षाचे समन्वयक प्रा. उज्वल पाटील आणि प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा यांनी या परिसर मुलाखतीचे यशस्वी व्यवस्थापन केले. या यशाबद्दल विद्यापीठाचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम