कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात MSW अभ्यासक्रमासाठी सुवर्णपदक जाहीर!

बातमी शेअर करा...

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात MSW अभ्यासक्रमासाठी सुवर्णपदक जाहीर!

जळगाव, दि. २२ (प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य (M.S.W.) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता ‘स्व. शिवराम दिला पाटील व स्व. शांताबाई शिवराम पाटील स्मृती सुवर्णपदक’ प्रदान करण्यात येणार आहे.

या सुवर्णपदकासाठी आवश्यक असलेला धनादेश जळगाव येथील प्रा. डॉ. पी.एस. पाटील (समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर) यांनी स्व. शिवराम दिला पाटील व स्व. शांताबाई शिवराम पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विद्यापीठास २१ जुलै, २०२५ रोजी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्याकडे सुपूर्द केला.

या प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, प्रा. डॉ. पी.एस. पाटील, डॉ. सौ. कविता पाटील, प्रा. जगदीश सोनवणे, प्रा. आशुतोष पाटील, प्रा. समीर नारखेडे आणि वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

या पुढाकारामुळे समाजकार्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रोत्साहन मिळेल आणि स्वर्गीय शिवराम दिला पाटील व शांताबाई शिवराम पाटील यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली जाईल. विद्यापीठाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम