
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री प्रवीण सोनावणे, समन्वयिका अनघा सागडे उपस्थित होते. रक्षाबंधनाचे महत्त्व ईश्वरी भावसार, षष्ठी भोरटक्के, सिद्धी नावडे या विद्यार्थिनींनी सांगितले. इयत्ता चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर गीत तर सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षिकांनी राखी बांधून त्यांचे औक्षण केले. तसेच प्रत्येक वर्गातील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना औक्षण करून राखी बांधण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणश्री पवार, तन्मयी बाविस्कर या विद्यार्थिनीनी केले. कार्यक्रम प्रमुख सौ. अश्विनी बाविस्कर सौ सुनीता पाटील,सारिका पाटील,प्रियंका बिरारी होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे प्राचार्य श्री प्रविण सोनावणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्राचार्य श्री प्रविण सोनावणे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम