किरकोळ कारणावरून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

धुळे शहरातील चितोड रोडवरील ध्वज चौकात घडली घटना

बातमी शेअर करा...

किरकोळ कारणावरून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

धुळे शहरातील चितोड रोडवरील ध्वज चौकात घडली घटना

धुळे प्रतिनिधी एका मोबाईल सिम कार्ड विक्रेत्या सोबत शाब्दिक वाद झाल्याने वाद विकोपाला जाऊन एका 27 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे शहरातील चितोड रोडवरील ध्वज चौकात उघडकीस आली असून या घटनेमुळे धुळे शहरात खळबळ उडाली आहे.

गौरव किरण माने वय 27 असे मयत तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ध्वज चौकामध्ये एका मोबाईल सिम कार्ड विक्रेत्याशी गौरव माने याचा हेडफोन गिफ्ट देण्यावरून वाद झाला.

सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन नंतर याचे रूपांतर हत्येमध्ये झाले. यावेळी वादाचा राग मनामध्ये ठेवून संशयित असलेले जय राजेंद्र पाकळे राजेंद्र एकनाथ पाकळे आणि ओम राजेंद्र पाकळे या तिघांनी गौरवला अडवून त्याच्यावर चाकू सारख्या दादा शस्त्राने पोटामध्ये वारकरीत गंभीर जखमी केले. मात्र गौरव याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम