
किशोर पाटील यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान
किशोर पाटील यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) : समाज चिंतामणी प्रतिष्ठान, जळगाव यांच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ यंदा पदवीधर शिक्षक किशोर पंढरीनाथ पाटील (अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, डोमगाव, ता. जळगाव) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे पार पडलेल्या छोटेखानी पण सन्माननीय कार्यक्रमात माजी शिक्षणाधिकारी निळकंठ आप्पा गायकवाड, साहित्यिक डी. बी. महाजन, कवी जयसिंगराव वाघ, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भास्कर चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते पाटील यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना पाटील यांनी सांगितले की, “या सन्मानामुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार मातृदिनाच्या दिवशी मिळाल्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे.”
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अशोक पारधे यांनी केले तर आभार प्रदर्शन समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम