“किशोर आप्पा माझा मानसपुत्र त्यांना निवडून द्या – पाचोरा मतदार संघ दत्तक घेणार  – मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वपूर्ण वचने”

"लाडक्या बहिणींसाठी शिंदे सरकारची खास घोषणा - 1500 वरून 2100 रुपये प्रतिमहिना मिळणार"

बातमी शेअर करा...

“किशोर आप्पा माझा मानसपुत्र त्यांना निवडून द्या – पाचोरा मतदार संघ दत्तक घेणार  – मुख्यमंत्री शिंदे यांची महत्त्वपूर्ण वचने”

“लाडक्या बहिणींसाठी शिंदे सरकारची खास घोषणा – 1500 वरून 2100 रुपये प्रतिमहिना मिळणार”

 “महायुतीच्या विजयी निर्धार सभेत मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे आश्वासन – लाडकी बहीण योजनेत वाढ”

पाचोरा । प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावू असे म्हणणार्‍या महाविकास आघाडीचा लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही.
तर आपले महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहीणींना 1500 वरून 2100 रूपये  प्रति महीना देऊ असे वचन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
एकनाथ शिंदे हे महायुतीचे पाचोरा-भडगाव मतदार संघाचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत ‘विजयी निर्धार’ सभेत बोलत होते.
किशोर
किशोर
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आमच्याकडे देना बँक आहे तर विरोधकांकडे फक्त लेना बँक आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मात्र विरोधक फक्त बोलतात कृतीत आणत नाही.
त्यामुळे तुमच्या योजना बंद पाडू असे म्हणणार्‍यांना आपण निवडून द्याल का? असा सवाल त्यांनी केला.
किशोर
किशोर
 याशिवाय लाडक्या बहीणींचा डिसेंबरचा हप्ता आपले सरकार आल्याबरोबर पुढच्या महीन्यात खात्यात जमा करू. महायुतीने शेतकऱ्यांना वीज बील मोफत केले आहे. तर मुख्यमंत्री सन्मान निधी 6 हजार रूपये देऊन बळीराजाचा सन्मान केला आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी रवींद्र पाटील, राजेंद्र मोरे, विनोद बागुल, शिवसेनेचे प्रवक्ते प्रदीप देसले आदींनी मनोगत व्यक्त करत आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
किशोर
किशोर
तर लाडका भाऊ योजनेतून तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे सरकार आल्यावर या विद्यार्थ्यांना प्रतिमहीना 10 हजार रूपये देणार आहेत.
तर कोरोना काळात काही जण घरात बसून, टीव्हीच्या माध्यमातून लोकांमधे होते. मात्र आम्ही त्यावेळी पीपीई कीट घालून लोकांचे दुख: समजुन घेत होतो. त्यांना मदत करत होता असा टोला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
दरम्यान त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात ही अहिराणी भाषेतून करत उपस्थितांची मने जिंकली. मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी रवींद्र पाटील, राजेंद्र मोरे, विनोद बागुल, शिवसेनेचे प्रवक्ते प्रदीप देसले आदींनी मनोगत व्यक्त करत आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप केदार यांनी तर आभार प्रविण ब्राम्हणे यांनी मानले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक तथा गांधीनगरचे उपमहापौर प्रेमळसिंह गोल, खासदार स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील तालुका प्रमुख सुनील पाटील,
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे, जि.प. माजी सदस्य विकास पाटील, डी. एम. पाटील,
भाजपचे माजी शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, बाजार समिती सभापती गणेश पाटील उपसभापती पी.ए.पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शशिकांत येवले, भाजपचे विधानसभा संयोजक अमोल पाटील,
तालुका सरचिटणीस अनिल पाटील, संजय गोहील, सुनीता पाटील, युवती सेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ प्रियंका पाटील, युवा नेता सुमित पाटील, शिवसेनेचे भडगाव तालुकाप्रमुख संजय पाटील,
उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील, भडगाव शेतकी संघाचे भैय्यासाहेब पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय चौधरी, बबलू देवरे, युवराज पाटील, किशोर संचेती
प्रा. चंद्रकांत धनवडे, नंदू पाटील, राजेश पाटील, समाधान पाटील, प्रवीण पाटील, शहर प्रमुख सुमित सावंत, शरद पाटे, युवासेनेचे लखीचंद पाटील, जितेंद्र जैन, समाधान पाटील, सुधाकर पाटील, जगदीश पाटील, सुनील पाटील,
रवींद्र पाटील, प्रमोद सोमवंशी, अविनाश कुडे, इंदल परदेशी, हेमंत चव्हाण, बापू हटकर,भाजपच्या रेखा पाटील, महिला आघाडीच्या सौ नंदा पाटील, मायाताई केदार उपस्थित होते.
किशोरआप्पा माझा मानसपुत्र -मुख्यमंत्री
किशोरआप्पा पाटील हा माझा मानसपुत्र आहे. त्यामुळे त्यांची हॅट्रीक करून दिली तर मी हा मतदारसंघ दत्तक घेणार आहे. येथील प्रलंबित गिरणा नदिवरील बंधाऱ्यांसाठी निधी देऊन ते पुर्ण करू, मंजुर एमआयडीसीत नविन उद्योग आणून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन मी या निमित्ताने देतो.
तसा ही किशोरआप्पा हा विकासाला पक्का आहे असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. तर आजची सभेला आलेली गर्दी पाहून किशोर पाटलांचा विजय निश्चित आहे. तर आप्पा हा विकास कामात वाघ असल्याचेही त्यांनी सांगीतले.
महायुतीचे एकमेव उमेदवार किशोर आप्पा- गिरीश महाजन
दरम्यान या विजय निर्धार सभेत काहीसे उशिरा उशिराने पोहोचलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यानंतर आभार प्रदर्शन करत असताना पाचोरा मतदारसंघातील नागरिकांनी कोणताही संभ्रम न बाळगता
महायुतीचे एकमेव उमेदवार किशोर आप्पा पाटील हेच असल्याचे ठासून सांगितल्यामुळे महायुती मधील समन्वय पुन्हा एकदा दिसून आला.
मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच त्यांनी जाहीर मंचावरून आमदार किशोर आप्पा पाटील यांनाच विजयी करण्याचे
जनतेला आवाहन केल्यामुळे त्यांच्या नावाने विविध वावड्या उठवणाऱ्या मध्ये मात्र यामुळे निराशा पसरल्याचे दिसून आले.

 

लाडक्या बहिणीकडून मुख्यमंत्र्यांचे औक्षण
सभास्थळी आगमन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाचोरा भडगाव मतदार संघातील लाडक्या भगिनींनी ठिकठिकाणी औक्षण केले.
सभास्थळी प्रवेशद्वारावरच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण करत त्यांच्यावर फुलांची उधळण केली तर मंचावर माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील डॉ. प्रियंका पाटील,

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख नंदा पाटील आरपीआयच्या प्रियंका सोनवणे शिवसेनेच्या संगीता साळुंखे माया केदार भाजपाच्या रेखा पाटील आदी महिला भगिनींनी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण केले.

 हे ही वाचा👇

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम