की्डा समन्वयकांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने योग आणि सूर्यनमस्कार प्रशिक्षण

जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

बातमी शेअर करा...

की्डा समन्वयकांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने योग आणि सूर्यनमस्कार प्रशिक्षण

जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व क्रीडा भारती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा की्डा समन्वयकांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने योग आणि सूर्यनमस्कार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सूर्यनमस्कार सर्वच ठिकाणी प्रचलित असून सर्वसामान्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीची माहिती नसल्याने सूर्यनमस्कार या योग साधनेच्या प्रकारातून गोडी आणि त्याची परिणामकारकता दिसून येत नाही.

म्हणूनच शूरवीरांच्या देशात अनेकांमध्ये डायबिटीस, बी.पी., हृदयविकार,शारीरिक व मानसिक विकारांच्या रोगांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी सूर्यनमस्काराचे शास्त्रोक्त अभ्यासासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी, रविंद्र नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती चंचल माळी, राज्य क्रीडा मार्गदर्शक (योगा) यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

सदर प्रशिक्षणास अजय देशमुख (चाळीसगाव), मनोज पाटील(एरंडोल), संजय वाढे (मुक्ताईनगर), सुनील वाघ(अमळनेर), गिरीश पाटील(पाचोरा), संदीप
पाटील(पारोळा), सचिन भोसले(भडगाव), सचिन सूर्यवंशी(धरणगाव), दिलीप संगेले(यावल), संजय निकम(बोदवड), युवराज माळी (रावेर), प्रदीप साखरे(भुसावळ), असिफ खान(जामनेर), राजेंद्र अल्हाट(चोपडा), प्रशांत कोल्हे(जळगाव), राजेश जाधव, अध्यक्ष जिल्हा डॉजबॉल असोसिएशन, व
खेळाडु आदि मान्यवर उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम