केजरीवालांसारखा खोटारडा पाहिला नाही – अमित शाह

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचा तिसरा जाहीरनामा प्रकाशित

बातमी शेअर करा...

केजरीवालांसारखा खोटारडा पाहिला नाही – अमित शाह

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचा तिसरा जाहीरनामा प्रकाशित

नवी दिल्ली वृत्तसंस्था

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचा तिसरा व अंतिम जाहीरनामा जारी केला. याद्वारे भाजपने तीन वर्षांत यमुना नदी प्रदूषणमुक्त करण्याचे, ५० हजार सरकारी पदे भरण्याचे, रोजगाराच्या २० लाख संघी निर्माण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अमित शाह यांनी आपल्या आयुष्यात केजरीवालांसारखा खोटारडा माणूस पाहिला नाही, अशी टीकाही केली.

दिल्ली प्रदेश भाजप कार्यालयात स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचा तिसरा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा खोटारडा असा उल्लेख केला. केजरीवाल म्हणायचे की, आमचा एकही मंत्री सरकारी बंगला घेणार नाही. मात्र, आज केजरीवालांनी स्वतःसाठी शिशमहाल बांधला आहे. रहिवासी वस्तीतील दारूची दुकाने बंद करण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यांनी मद्य परवाना वाटपात घोटाळा करून शाळा, मंदिर, गुरुद्वारांच्या बाजूलाही दारू दुकानांसाठी परवाने दिले. मोहल्ला क्लिनिकचे गाजर दाखवून दिल्लीकरांना आधुनिक हॉस्पिटलपासून वंचित ठेवले. केजरीवाल दिल्लीकरांना आश्वासने देतात आणि नंतर केविलवाणा चेहरा करतात. केजरीवालांसारखा खोटारडा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही, असे अमित शाह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी केजरीवालांना यमुना

नदीत स्नान करून दाखविण्याचे आव्हान दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम