कोट्यवधीच्या – आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते विकास कोट्यवधीच्या विकास कामांचे उद्घाटन

उद्घाटन कार्यक्रमास माजी आमदार प्रा. चंद्रकांत आण्णा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती

बातमी शेअर करा...

उद्घाटन – आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते विकास कोट्यवधीच्या विकास कामांचे उद्घाटन

उद्घाटन कार्यक्रमास माजी आमदार प्रा. चंद्रकांत आण्णा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती

किनगाव ता. यावल – चोपड़ा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार लता सोनवणे व कार्यसम्राट माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून साकळी गावासाठी मंजूर झालेले

जवळपास अडीच कोटींच्या निधीतील विविध विकास कामांचा तसेच परिसरातील गावांमध्ये मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ बुधवार दि. २१ रोजी आ. लता सोनवणे यांच्या हस्ते झाला.

https://www.facebook.com/share/p/JySBN3cnShB4UdhP/?mibextid=oFDknk

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यसम्राट माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे होते. साकळी बस स्टँड जवळपास १ किमी रस्ता, गटारीसह
रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करणे (२ कोटी १६ लक्ष),

साकळी तलाठी कार्यालयाचे बांधकाम करणे (१२ लक्ष ) तसेच चौकाचे सुशोभिकरण करणे (१५ लक्ष ) असे जवळपास अडीच कोटींच्या कामांचा उद्घाटन समारंभ करण्यात आला.

तसेच परिसरातील साकळी ते मनवेल रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण
करणे (२ कोटी ४२ लक्ष), साकळी ते मनवेल पुलाचे व पोहच रस्त्याचे बांधकाम तसेच तसेच शिरसाड व वढोदा येथे जि. प. शाळा खोली बांधणे (२४ लक्ष) व दलित वस्तीत बौद्ध विहार बांधणे (२० लक्ष)

यासह मनवेल, दगडी, थोरगव्हण, वढोदा येथे मंजूर झालेल्या कोट्यावधी रुपयाच्या निधींचा विकास असलेल्या कामांचा समावेश आहे. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान सर, तालुका उपप्रमुख विनायक आप्पा

कोट्यवधीच्या

शिवसेनेचे युवा तालुकाध्यक्ष गोटूभाऊ सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक महाजन, युवा कार्यकर्ता महेंद्र चौधरी, नस्सोभाई पेंटर, तुषार ठोसरे, थोरगव्हाण सरपंच समाधान सोनवणे, साकळी विकासोचे संचालक शाम महाजन, तुकाराम महाजन, जिवन बडगुजर,

माजी ग्रामपंचायत सदस्य दिनकर माळी, निलिमा नेवे, बेबाबाई चौधरी, ग्रामपंचायत सदस्य विनोद खेवलकर, शारदा विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रमोद सोनवणे, संजय (टेलर) पाटील (साकळी), रविंद्र पारिस्कर

यांचेसह साखळीसह पंचक्रोशीतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. साकळीकरांसाठी अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या साकळी बस स्टँड रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटारीचे काम होणार असल्याने साकळीसह परिसरातील दळणवळणाची समस्या सुटणार आहे.

आमदारांकडून गावात व परिसरात सर्वत्र विविध विकास कामे केली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे. मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडू स्वागत करीत ठीक ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले.

हे ही वाचा👇

भूमिपूजन – चोपडा तालुक्यात १४ कोटी ४५ लाखाच्या कामाचे आ. सौ लताताई सोनवणे यांच्या हस्ते भुमिपुजन

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम