कोळी समाजाचे आंदोलनास आमदार सोनवणे दांपत्याची भेट

कोळी समाज प्रश्नी जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा

बातमी शेअर करा...

कोळी समाजाचे आंदोलनास आमदार सोनवणे दांपत्याची भेट

जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा

चोपडा – ढोर कोळी, महादेव कोळी , मल्हार कोळी, टोकरे कोळी जमातीच्या समाज बांधवांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

तसेच जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून विनंती केली असता संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र देण्यास हिरवा सिग्नल दिला आहे.

प्रा.सोनवणे यांनी स्पष्ट केले की, ज्या आदिवासी बांधवांची जात प्रमाणपत्रासाठी दाखल कागदपत्रे परिपूर्ण असतील अशा बांधवाचे प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तसेच मागे आपण टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी जमात बांधवांची व्यथा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मांडलेली आहे.

त्यावर देखील लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र कायदयात अनेक अडचणी असतात त्या दूर करून कसा मार्ग काढता येईल यावर सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे टोकरे कोळी जमातीच्या वतीने पुंडलिक सोनवणे व प्रभाकर कोळी या बांधवांनी जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.

त्या आंदोलनास आमदार सोनवणे दांपत्याने भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे, त्यावेळी प्रा.सोनवणे आंदोलकांशी बोलत होते.

हे वाचा👇

भडगाव शहरातील मेन रोडवर अवजड वाहनांना बंदी करा अन्यथा अंदोलन : तालुकाध्यक्ष दिनेश महाजन

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम